राज्यात शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचे मिळून महायुतीचे सरकार सत्तेत आलं. परंतु पालकमंत्री (GUARDIAN MINISTER) पदाबाबतचा तिढा पूर्णपणे अद्यापही सुटल्याचा दिसत नाही. कारण रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतरही सरकारनं या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही आहे परंतु भाजपा नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी (GUARDIAN MINISTER OF NASHIK) आग्रही आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला सपशेल नाकारलं. महायुतीला राज्यातील जनतेला 237 जागांवरती आशीर्वाद दिला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत कलह निर्माण झाला. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. परंतु भाजपाला तब्बल 133 जागांवरती विजय मिळाल्याने भाजपही मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होती. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक दिवस लागले. मंत्री पदावरूनही महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच झाले. मंत्रिमंडळाचा तिढा महायुतीने कसाबसा सोडवला तोच पालकमंत्री पदाचा तिढा वाढला. महायुती सरकार पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले. धनंजय मुंडे, दादा भुसे, भरत गोगावले या मंत्रांना कोणत्याही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद मिळाला नाही. परंतु रायगडचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांना देण्यात आल्याने शिवसेनेच्या भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध केला. तर नाशिकच्या पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना मिळाल्या दादा भुसे नाराज झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाही त्यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. परंतु तरीही भाजपा नाशिकच्या पालकमंत्री पदावर आग्रही आहे.
सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्री पद
देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्री आपले विश्वासूत सहकारी गिरीश महाजन यांच्याकडे दिले.पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील नाराजी समोर येताना दिसतेय. रायगड आणि नाशिकवरुन महायुतीत धुसफुस सुरू झाली आहे.त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन भाजप प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय… येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2027 च्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्त्वाचं असल्याने भाजप देखील अडून बसल्याची माहितीये. 5 आमदार असतानाही जिल्ह्यात भाजपचा मंत्री नसल्याची उणीव भाजपाला जाणवत आहे. त्याचबरोबर2027 मध्ये नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6 हजार 900 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला.कुंभमेळ्याचा अनुभव असल्याने भाजप गिरीश महाजनांसाठी आग्रही आहे. पालकमंत्री पदाचा फायदाही आगामी महापालिका, झेडपी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका पुन्हा ताब्यात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.