Sharad Pawar

Sharad Pawar : अजितदादा गोविंदबागेत भेटायला का आले नाही? शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

1243 0

पुणे : दिवाळी पाडवा निमित्त बारामती येथील गोविंदबागेत आयोजित केलेला भेटीगाठीचा कार्यक्रम संपला. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेत असतात आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील चार आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये असून सुद्धा शरद पवार यांची पाडवा निमित्त भेट घेतलेली नाही. त्यामुळे चर्चाना उधाण आले. अजित पवारांच्या गैरहजेरीवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
‘रोहित पवार हे बीडला आहेत. तिकडच्या लोकांनी मला सांगितलं त्यांची तिकडे यात्रा सुरू आहे. मात्र काहींचे व्यक्तिगत आजार असतात, वैयक्तिक काम असतात त्यामुळे काही जण आले नसतील, असं म्हणत शरद पवारांनी अजितदादांच्या गैरहजेरीवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मात्र शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार गोविंद बागेत आले नाहीत पण मात्र पार्थ पवार गोविंद बागेत आले आणि पवारांना भेटून गेले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!