EKNATH SHINDE VS GANESH NAIK : एकनाथ शिंदे, गणेश नाईक यांच्यातील वाद का पेटला

51 0

राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. मंत्री गणेश नाईक (GANESH NAIK)आणि खासदार श्रीकांत शिंदे (SHRIKANT SHINDE) यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता अधिकच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये सुरू असलेल्या शब्दयुद्धामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

नवी मुंबईतील (NAVI MUMBAI) विकासकामांच्या संदर्भात नगरविकास विभागाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत गणेश नाईक (GANESH NAIK) यांनी गंभीर आरोप केले. मोकळ्या भूखंडांच्या वाटपाबाबत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांच्या कारभारावर बोट ठेवले. या विधानानंतर सत्ताधाऱ्यांमध्येच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर (RAVINDRA DHANGEKAR) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करत “विकासाच्या रथाशी स्पर्धा करण्याची तुमची क्षमता नाही,” असा टोला लगावला. त्यांनी एक फोटो शेअर करत आपली भूमिका अधिक ठळक केली.

या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव अधोरेखित झाला असून पुढील काही दिवसांत या वादाची दिशा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!