मुख्यमंत्री कुणाचा? गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे आज निकाल

321 0

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांचे निकाल आज स्पष्ट होणार असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आम आदमी पक्ष आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. 

गुजरात विधानसभेचे 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडले असून हिमाचल प्रदेश मध्ये 68 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली सध्या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाचा सरकार असून हिमाचल प्रदेश मध्ये जयराम ठाकूर तर गुजरात मध्ये भूपेंद्र पटेल सध्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पुन्हा आपलं सरकार येईल असा दावा भाजपाकडून करण्यात येत असला तरी यावेळी आम आदमी पक्ष देखील मैदानात उतरल्याने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती अशी स्थिती काही उद्भवणार का हेच आता या निकालातून स्पष्ट होईल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!