गावगाड्याचा कारभारी कोण? ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल

234 0

राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. रविवारी (18 डिसेंबर)पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

आज गुलाल कुणाचा यावरच आज गावागावातील पारावर चर्चा होणार आहे. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. बीडच्या नाथ्रा गावात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कधी नव्हे ते एकत्र आलेत.

चुलत बंधू अभय मुंडे यांच्या विजयासाठी पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्त्यांची एका पाहायला मिळाली तर नवगण राजुरी येथे जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. औरंगाबादेत संदीपान भुमरे यांनी ताकद लावलीय. तिथं महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे.

Share This News
error: Content is protected !!