TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT:  महाविकास आघाडीत कोण असू शकतं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

388 0

 

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असून विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता आल्यास महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असू शकतं यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…..

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवून निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात. त्याचबरोबर बिनचेहऱ्याचं सरकार किंवा बिनचेहऱ्याची आघाडी चालणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे माविआतील मुख्यमंत्री पदाच्या जागावाटपाच्या चेहरा कोण असणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या… काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे कोण दावेदार असू शकतं पाहुयात

नाना पटोले: काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष आणि साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे.

बाळासाहेब थोरात: काँग्रेसकडून विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांचं नावदेखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असून बाळासाहेब थोरात यांच्याकडे विविध मंत्रिपदाचा अनुभव असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष पदही बाळासाहेब थोरात यांनी सांभाळलं.

पृथ्वीराज चव्हाण: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही काँग्रेस मधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही काँग्रेस मधून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही काँग्रेस मधून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुख्यमंत्री पदासाठी कोण दावेदार असू शकतो पाहूया

उद्धव ठाकरे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे.

आदित्य ठाकरे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिला जात असून युवा आणि आक्रमक चेहरा म्हणून आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद दिला जाऊ शकतं असं बोललं जात आहे

सुभाष देसाई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं नावही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे..

आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षातून मुख्यमंत्रीपदासाठी कोण चर्चेत आहे पाहूयात…

जयंत पाटील: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात असून जयंत पाटील यांनी अर्थ, गृह तसेच जलसंपदा सारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी या अगोदर सांभाळली आहे..

रोहीत पवार: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील युवा आणि आक्रमक चेहरा अशी ओळख असणाऱ्या कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाचीही मुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे…

राजेश टोपे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रमुख चेहरा अशी ओळख असणारे राजेश टोपे यांचे नावही मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असून कोरोना काळात आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी उल्लेखनीय काम केलं होतं

एकंदरीतच महाविकास आघाडी मधील तीनही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी मोठे रस्सीखेच पाहायला मिळत असून नेमकं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होतं हे पाहण्यासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!