WHO IS SUDHAKAR BADGUJAR:मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे ठाकरे गटाचे नेते उपनेते सुधाकर बडगुजर

WHO IS SUDHAKAR BADGUJAR: संजय राऊतांचे राईट हॅन्ड ते ठाकरे गटातून हकालपट्टी;कोण आहेत सुधाकर बडगुजर?

758 0

WHO IS SUDHAKAR BADGUJAR: मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे ठाकरे गटाचे नेते उपनेते सुधाकर बडगुजर
कधी स्व-पक्षावरच नाराज आहे म्हणणं तर कधी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे सुधाकर बडगुजर चर्चेत आले होते WHO IS SUDHAKAR BADGUJAR:

याच सुधाकर बडगुजर यांच्या आज ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली नेमके कोण आहेत सुधाकर बडगुजर पाहुयात

WHO IS SUDHAKAR BADGUJAR| ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर नेमके कोण?

नाशिक मधील ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ अशीच सुधाकर बडगुजर यांची ओळख होती.

2007 मध्ये सिडकोतून ते पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

त्यानंतर त्यांनी14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले.

पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले.

2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला.

2019 साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली होती.
मात्र, यंदा देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला.

सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते.

आता त्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. संजय राऊत यांचे विश्वासू अशी देखील सुधाकर बडगुजर यांची एकेकाळी ओळख होती.
राजकारणात आक्रमक आणि अभ्यासू अशी ओळख असणाऱ्या

सुधाकर बडगुजर यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्तही राहिली असून

2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या

प्रकरणात 2023 मध्ये त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली .

तसेच, 2023 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गैरवर्तनाच्या आरोपांखाली तक्रार दाखल केली होती.

जिल्हाध्यक्ष असताना सुधाकर बडगुजरांची सलीम कुत्तासोबत पार्टीत नाचतानाचा बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही बडगुजर यांच्यावर मोठी टिकेची झोड उठली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेले सुधाकर बडगुजर आता ठाकरे गटातील हकालपट्टीनंतर भाजपात प्रवेश करणार की कोणता वेगळा विचार करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Share This News
error: Content is protected !!