WHO IS DEEPAK KATE: प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा आरोपी दीपक काटे नेमका कोण?

66 0

WHO IS DEEPAK KATE:  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शाई फेक करण्यात आली..

त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली.. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी दीपक काटे हा नेमका कोण आहे पाहुयात

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या सराटी गावाचा दीपक काटे हा रहिवासी आहे.

दीपक काटे याने शिवधर्म फाउंडेशनची स्थापना केली असून तो या संस्थेचा संस्थापक आहे. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून

दीपक काटे याने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी बिडी विरोधात आंदोलन केले होते. दीपक काटे याच्या आंदोलनानंतर (WHO IS DEEPAK KATE) संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आले होते.

याशिवाय दूध दराच्या प्रश्नी दीपक काटे याने शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयबाहेर आंदोलन केलं

EXCISE DUTY ACTION ILLIGAL ALCOHOL: गोव्यातून तस्करीसाठी आणलेला अवैध मद्यसाठा पुण्यात जप्त

25 जून 2021 मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक अशोक जिंदालला काळं फासलं होतं..2022 मध्ये त्याने भाजपात प्रवेश केला. त्यानंतर 26 मार्च 2023 रोजी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या 52 शाखेचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून देखील त्याची ओळख आहे.6 जानेवारी 2025 पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना प्रवाशाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काढतूसे सापडली होती. त्यावेळेस दीपक काटे याला अटक करण्यात आली होती..

TOP NEWS MARATHI : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ते भाजप पदाधिकारी प्रवीण गायकवाडांवर शाईफेक करणारा दीपक काटे नेमका कोण ?

इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या सराटी गावात शेताच्या बांधाच्या वादावरून सख्ख्या चुलत भावाचा त्याने खून केला होता. त्या गुन्ह्यात तो सात वर्षे येरवडा कारागृहामध्ये होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहे..गेल्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेड या नावाला दीपक काटे याच्या शिवधर्म फाउंडेशनकडून विरोध केला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकरी नाम उल्लेख होत असल्याने नाव बदलण्यात यावे, अशी शिवधर्म फाउंडेशनकडून केली जात होती.. आणि अखेर प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय..

Share This News
error: Content is protected !!