बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण या प्रकरणांची चर्चा असतानाच भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.भगीरथ बियाणी यांच्या हत्येने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यांची ही आत्महत्या प्रचंड गूढ विषय ठरला. भगीरथ बियाणे यांचे धाकटे बंधू प्रवीण बियाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार.बियाणी यांनी आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री आपल्या कुटुंबासोबत उशिरापर्यंत गप्पा मारल्या त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले.11 ऑक्टोबरला सकाळी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.मळमळ होत असल्याने ते वाटेतूनच घरी परतले.आपल्या खोलीत आराम करत असताना याच दरम्यान त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. बंदुकीचा आवाजाने कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेत दरवाजा उघडला त्यावेळी भगीरथ बियाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.डोक्यातून रक्तस्त्राव सुरु होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून जिल्हा रुग्णालयात नेलं.तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.बियाणी यांच्याकडून रिव्हॉल्वर साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी.असं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं होतं. पाहुयात याबातबाचा हा रिपोर्ट.
