एनडीए सरकारमध्ये ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असलेल्या जेडीयू आणि टीडीपीकडून कोण घेणार मंत्रीपदाची शपथ

1657 0

देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचा सरकार स्थापन होणार असून  नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

एनडीए सरकार मध्ये किंगमेकर ची भूमिका बजावणारा नितेश कुमार यचा जनता दल युनायटेड आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाला प्रत्येकी दोन याप्रमाणे चार मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड कडून राजीव रंजन उर्फ लालन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पार्टीकडून तीन वेळा खासदार असलेले राम मोहन नायडू हे टीडीपी कोट्यातून नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील आणि पी चंद्रशेखर पेम्मासानी हे राज्यमंत्री असतील अशी माहिती समोर येत आहे.

Share This News
error: Content is protected !!