मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष बांधणी करताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा एक फॉर्म्युला समोर आला असून या फॉर्मुल्यावर जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरत काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 90 ते 95 जागा लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाविकास आघाडी म्हणून हा फॉर्म्युला निश्चित होतो का की कोणत्या नव्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे