मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार? मंत्री अदिती ‘ही’ तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती

251 0

मुंबई: राज्यातील महिलांसाठी सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला सध्या मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. 

या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. महिलांच्या खात्यावर आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात आले त्यानंतर आता या योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

आज अखेर झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली असून की त्या 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा महिलांच्या खात्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ज्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत त्यांनाही या योजनेचा फायदा होईल असं मंत्री अतिथी तटकरे यांनी सांगितलेला आहे

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती म्हणाले भविष्यात…

लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत ? मग आजच आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करा, कसं ते वाचा सविस्तर

Share This News
error: Content is protected !!