Eknath Shinde Sad

आजच्या सर्व बैठका रद्द; एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं चाललंय काय?

158 0

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती 230 जागा जागा मिळवत स्पष्ट बहुमतात सत्तेत आली. मात्र आज निकाल लागून 10 दिवस झाल्यानंतरही अजून मुख्यमंत्रीपदाचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.

अशातच 28 नोव्हेंबरला दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीतील नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर मुंबईत महायुतीची बैठक होणार होती.

मात्र ती बैठक रद्द करून एकनाथ शिंदे थेट साताऱ्यातील आपल्या दरे या मूळ गावी रवाना झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली अशा बातम्या समोर येत होत्या त्यानंतर काल एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावातून पुन्हा ठाण्यात परतले असून आता आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांची बोलावलेली बैठकही रद्द केली आहे.  त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलय

Share This News
error: Content is protected !!