नवी दिल्ली: संसदेचा सर्वोच्च सभागृह असणाऱ्या राज्यसभेतील 12 रिक्त खासदारांच्या जागेवर लवकरच मतदान होण्याची शक्यता आहे या जागांमध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या 12 जागा रिक्त झाल्या असून यामधील 9 खासदार लोकसभेवर तर दोन खासदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेचाही समावेश आहे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले आणि पियुष गोयल हे लोकसभेवर विजयी झाल्याने त्ची राज्यसभेतील जागा रिक्त झाली आहे. उदयन महाराज भोसले यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 2026 पर्यंत तर पियुष गोयल यांचा कार्यकाळ 2018 पर्यंत होता.
कोणत्या राज्यातील किती जागा रिक्त?
महाराष्ट्र
- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
- पियुष वेदप्रकाश गोयल
आसाम
- सर्वानंद सोनेवाल
- कामाख्या प्रसाद तासा
बिहार
- मीशा भारती
- विवेक ठाकूर
हरियाणा
दिपेंदरसिंग हुडा
मध्यप्रदेश
ज्योतीरादित्य सिंधिया
राजस्थान
के.सी.वेणुगोपाल
त्रिपुरा
बिप्लव कुमार देव
तेलंगणा
डॉ. के केशव. राव
ओडिसा
ममता मोहंता