नवी दिल्ली: संसदेचा सर्वोच्च सभागृह असणाऱ्या राज्यसभेतील 12 रिक्त खासदारांच्या जागेवर निवडणूक जाहीर झाली असून या जागांमध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या 12 जागा रिक्त झाल्या असून यामधील 9 खासदार लोकसभेवर तर दोन खासदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाले आहेत. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून याच दिवशी राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे
कसा असणार निवडणुकीचा कार्यक्रम
अधिसूचना : 14 ऑगस्ट 2024
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024
उमेदवारी अर्ज यांची छाननी 22 ऑगस्ट 2024
मतदान 3 सप्टेंबर 2024 सकाळी 9 ते 4
मतमोजणी 3 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू होईल
कोणत्या राज्यातील किती जागा रिक्त?
महाराष्ट्र
- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
- पियुष वेदप्रकाश गोयल
आसाम
- सर्वानंद सोनेवाल
- कामाख्या प्रसाद तासा
बिहार
- मीशा भारती
- विवेक ठाकूर
हरियाणा
दिपेंदरसिंग हुडा
मध्यप्रदेश
ज्योतीरादित्य सिंधिया
राजस्थान
के.सी.वेणुगोपाल
त्रिपुरा
बिप्लव कुमार देव
तेलंगणा
डॉ. के केशव. राव
ओडिसा
ममता मोहंता