म्हणून नितीश कुमार पुन्हा एनडीएत आले; विनोद तावडे यांनी सांगितली संपूर्ण INSIDE STORY

636 0

विनोद तावडे म्हणाले, आम्ही (भाजपा) आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हे दोन पक्ष मिळून बिहारचा राज्यकारभार चालवत होतो. आमचे आमदार जास्त असूनही आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं होतं. परंतु, त्यांच्या मनातली असुरक्षिततेची भावना आणि लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना दिलेली आश्वासनं यामुळे नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलबरोबर गेले. त्यांनी आमच्याबरोबरची युती तोडून राजदबरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. परंतु, यामध्ये कळीचा मुद्दा ठरणारी घटना म्हणजे सव्वादोन महिन्यांपूर्वी बंगळुरू येथे इंडिया आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांकडे झालेलं दुर्लक्ष. ही आघाडी होत असताना लालूप्रसाद यादव यांनी तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा बनू शकता त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या. असं नितीश यांना सांगितलं होतं आता नीतीश कुमारांना ते पंतप्रधान म्हणून निवडून येऊ शकत नाही हे माहिती होते. पण तो चेहरा झाला तर त्या बळावर २०२४ ला निवडणूक होईल परंतु त्यानंतर २०२५ ची निवडणूक मला आरामात जिंकता येईल या विचाराने नीतीश कुमार यांनी आमची साथ सोडली आणि विरोधात गेले असं विनोद तावडे म्हणाले…

त्याच बरोबर तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले असतेतर गुंडाराज आलं असतं असं विनोद तावडे म्हणाले. ते रोखण्यासाठीच नितीश कुमार यांनी भाजपसोबत पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला असं तावडे म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!