राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून शिवसंग्राम चे प्रमुख स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती विनायक मेटे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची जबाबदारी ज्योती मेटे या सांभाळत होत्या मात्र अचानक ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांन उधाण आलय
ज्योती मेटे यांच्या सह सलीम पटेल बाळासाहेब खोसे यांनीही पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते