Vijay Wadettiwar On Nitesh Rane

Vijay Wadettiwar On Nitesh Rane: साडेचार फुट मंत्री म्हणतो, धर्म विचारून सामान घ्या

2804 0

Vijay Wadettiwar On Nitesh Rane मुंबई : देशात आणि राज्यात सध्या जातीयतेचे विष पेरले जात असून बीडमध्ये तर दोन जातीच्या लोकांना एकमेकांविरोधात उभे केले जात आहे.

त्यात आता साडेचार फुटाचा एक मंत्री जनतेला जात विचारून दुकानातून सामान घेण्याचे सांगत आहे, अशा तीव्र शब्दात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे (Vijay Wadettiwar On Nitesh Rane) यांच्यावर टीका केली आहे.

दापोली येथील एका सभेत बोलताना राणे यांनी दुकानदारांकडून सामान विकत घेताना त्याला त्याचा धर्म विचारायचा, असा सल्ला हिंदू धर्मातील लोकांना दिला होता.

त्यावर वडेट्टीवार (Vijay Wadettiwar On Nitesh Rane)यांनी ही प्रतिक्रिया दिली.

LAXMAN HAKE ON AJIT PAWAR | अजित पवारांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करावा

ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसला फोडून रिकामे करण्याची वल्गना करीत आहेत.

मात्र, आमचे दिवस आले तर आम्ही सुद्धा चुनचुनके मारू, असा डायलॉग त्यांनी मारला.

एकनाथ शिंदे व अजित पवारांचा केवळ वापर केला जात आहे.

पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील, हे पहावे लागेल.

महायुती सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली.

पहलगाम हल्ल्याला १० दिवस लोटले तरीही दहशतवादी सापडले नाहीत.

त्यांचे कपडे, लोकेशन सगळे भेटले,

पण तरीही दहशतवादी का सापडत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

राज व उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन सर्वधर्मसमभाव जोपासावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने

BHIWANDI NEWS: लटकलेले मृतदेह, सुसाईड नोट आणि उद्ध्वस्त कुटुंब भिवंडीतील आत्महत्या कांड

HARSHWARDHAN SAPKAL:बीड जिल्ह्याच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा 

SANJAY RAUT ON BJP: भाजपसोबत राहून एकनाथ शिंदे, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत

HARSHWARDHAN PATIL BROTHER VIRAL VIDEO| हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाकडून डॉक्टरांना मारहाण

New Crop Insurance Policy: शेतकऱ्यांसाठी नवी पीकविमा योजना;राज्य मंत्रिमंडळ निर्णय

पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

राज्यमंत्री MADHURI MISAL यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेत महाप्रीतच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा

उद्धव ठाकरेंना मुंबईत झटका, माजी महापौर दत्ता दळवी एकनाथ शिंदेंच्या गोटात

Share This News
error: Content is protected !!