kishore gajbhiye

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

408 0

नागपूर: रामटेक लोकसभे मधून वंचित कडून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रामटेक लोकसभेसाठी वंचितकडून शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला मात्र काही तांत्रिक कारणां मुळे त्यांनी माघार घेतल्याचे वंचितकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे रामटेकमध्ये आता महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि वंचित कडून पाठिंबा देण्यात आलेले किशोर गजभिये यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

कोण आहेत किशोर गजभिये?
किशोर गजभिये हे काँग्रेसमधून लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुक होते मात्र त्यांना संधी न देता काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना संधी देण्यात आली. मात्र आता रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या ठिकाणी डमी फॉर्म भरलेले त्यांचे पती, श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राला किशोर गजभिये यांनी आक्षेप घेत अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!