Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

535 0

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर (Vanchit Bahujan Aaghadi) सातत्याने बैठकींचं सत्र सुरु असतानाच आज अचानक वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याची घोषणा करत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली.

पहिल्या यादीमध्ये कोणाला मिळाली संधी ?
भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट (दिवर समाज)
गडचिरोली-चिमुर – हितेश पांडुरंग मडावी (गौंड समाज)
चंद्रपूर – राजेश वारलुजी बेले (तेली समाज)
बुलढाणा – वसंत राजाराम मगर (माळी समाज)
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान (राखीव)
वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंखे (कुणबी)
यवतमाळ वाशिम – खेमसिंग प्रतापराव पवार (बंजारा)
नागपूर – काँग्रेसला समर्थन
सांगली – ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली असून प्रकाश शेंडगे लढत असतील तर त्यांना पाठिंबा देणार

रामटेक मतदारसंघाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी 4 वाजता घोषणा केली जाईल असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sadanand Date : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डायरेक्टर जनरलपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!