वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर; पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी

466 0

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाले असून यामध्ये पाच उमेदवारांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये पुण्यातून माजी नगरसेवक वसंत मोरे यांना वंचित ची उमेदवारी जाहीर झाली असून शिरूर मधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार नसून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार आहे.

वंचित बहुजन आघाडी कडून आत्तापर्यंत 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आले असून आज जाहीर केलेल्या यादीमध्ये छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून अफसर शेख यांना उमेदवारी देण्यात आली असून नांदेड मधून अविनाश भोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले पुण्यातून वसंत मोरे शिरूर मधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!