ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

मुंबईत पोहचताच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना

मुंबई – अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या विधान परिषद सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे.

त्यानंतर भाजपाच्या गोटात सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.यातच आता शिंदे गटाची गोव्यात सुरू असलेली बैठक संपवून  एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले होते.

मुंबईत पोहचताच शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झाले असून देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर ही भेट होणार असून या भेटीनंतर फडणवीस आणि शिंदे एकत्रित राजभवनाकडे रवाना होणार आहेत