नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि शिरूर मतदार संघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला होता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो यावर चा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी पाहायला मिळत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलं जात असल्याचा पाहायला मिळत आहे.. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीमध्ये ही महाराष्ट्रातील अनेक प्रमुख मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतो
कोणत्या प्रमुख मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळेल?
बारामती विधानसभा मतदारसंघ: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मतदारसंघ असणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघातच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळतो 1991 पासून 2019 पर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सलग बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याच्या चर्चा सुरू असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा होम ग्राउंड असणाऱ्या बारामती मतदारसंघातच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष होण्याची शक्यता आहे
आंबेगाव विधानसभा: राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ असणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम इच्छुक असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे..
कागल विधानसभा मतदारसंघ: राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणारे समरजीत सिंह राजे घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असल्याने या मतदारसंघातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष होण्याची शक्यता आहे
सिंदखेडराजा मतदारसंघ: माजी मंत्री आणि सिंदखेड राजाचे अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र भास्कर शिंगणे यांच्या विरोधात त्यांच्याच पुतणी गायत्री शिंगणे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केल्यानं या मतदारसंघातही राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी संघर्षाची शक्यता आहे
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होते का आणि याशिवाय अन्य कोणत्या मतदारसंघांमध्ये काका विरुद्ध पुतण्या उभे ठाकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे…