Uddhav Thackeray : महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा या दोघांच्या एकत्र येण्याकडे लागून राहिलेल्या होत्या. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो तर एकत्र राहण्यासाठीच अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली यामुळेच आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार (Uddhav Thackeray) असल्याचे संकेत मिळाले आहेत
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये कोणते मुद्दे मांडले? ते जाणून घेऊयात… उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा कौतुक केलं. उद्धव ठाकरे यांनी देखील भाषणाची सुरुवात करताना ‘सन्माननीय राज आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो’ अशी केली.
पुढे उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष भाषणापेक्षाही आमच्या दोघांच्या एकत्र असण्याकडे असल्याचं नमूद केलं. माझ्या भाषणाची काय गरज आहे असं वाटत नाही ते असं पुढे म्हणाले आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचे लक्ष आहे असं ते म्हणाले.
एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी
राजकीय वर्तुळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून बरीच टीकाटिप्पणी सुरू होती त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आमच्या दोघातील अंतर पाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
*TOP NEWS MARATHI : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसह शिवसेनेतील सर्व मोठ्या नेत्यांचा “यूज अँड थ्रो केला”
मोदींची शाळा कोणती? ((Uddhav Thackeray)
पुढे बोलताना त्यांनी सरकारला टोला लगावला, वापरायचं आणि फेकून द्यायचं हे या सरकारचं धोरण मात्र आता आम्ही दोघं एकत्र आलोत आता आम्ही तुम्हाला फेकून देऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले राज तू सगळ्यांची शाळा घेतलीस पण मोदींची शाळा कोणती? असं म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
केवळ आगामी महापालिका निवडणुकांसाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत अशी विरोधकांची टीका आहे मात्र हा महापालिकेचा नाही हा महाराष्ट्राचा म आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
सत्तेत दोन व्यापारी बसलेत आणि त्या व्यापाऱ्यांची बूट चाटण्यासाठी हे लोकं बसलेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजप तोडा फोडीचं राजकारण करतय असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी भाजपवाल्याना कोणाच्या लग्नात बोलवू नका नाहीतर ते तिथेही तेच करतील इथेही नवरा बायकोच्यात भांडण लावतील… नाहीतर नवरीलाच पळवून नेतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शेवटी जाता जाता मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा ! तुटू नका ! फुटू नका ! असा संदेश मराठी माणसांना उद्धव ठाकरे यांनी दिला.