Uddhav Thackeray Dussehra Controversy: मुंबईत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचाही दसरा मेळावा जोरदार पार पडला. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर (Uddhav Thackeray Dussehra Controversy) अनेक टीकास्त्र झाली. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी एक खळबळ जनक वक्तव्य केलं. या वक्तव्यात ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस ठेवला. व त्यानंतर त्या मृतदेहाचे ठसे घेण्यात आले.
Dussehra Vehicle Sales Pune 2025: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहरात साडेनऊ हजार वाहनांची विक्रमी खरेदी
रामदास कदम यांनी काय आरोप केला होता?
रामदास कदम यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळीच्या घडामोडींचा उल्लेख केला. त्यावेळी ते म्हणाले, “माझी एकनाथ शिंदेंना (Uddhav Thackeray Dussehra Controversy) विनंती आहे. शिवसेनाप्रमुखाच निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीने मोठे विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी आठ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो सगळं कळत होतं. हे सगळं कशासाठी?” असे आरोप यावेळी रामदास कदम यांनी केले. यानंतर हे टीका युद्ध गेले दोन दिवस सतत सुरू आहे. यावर अनिल परब आणि संजय राऊत यांनी देखील वक्तव्य केलं.
PMC ELECTION FINAL DRAFT WARD:पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आणि अखेर आता उद्धव ठाकरे या आरोपांवर बोललेत. “मी गद्दारांना उत्तर देत नाही. ठाकरे म्हणजे काय ते सगळ्यांना माहिती आहे. पण मी गद्दार आणि हरामखोरांना (Uddhav Thackeray Dussehra Controversy) उत्तर देणार नाही. अशा प्रकारे आरोप झाल्यावर त्रास होतो का? असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले “होय, मला त्रास होतो पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं माझं भाषण थांबू का? विचारल्या वर तुम्ही बोला म्हणतात तेव्हा त्या या वेदनांवर रामबाण उपाय ठरतात. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठीशी आहेत म्हणून तर मी उभा राहू शकलो.’