आपला महाराष्ट्रराजकारण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र विशेष न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड ठोठावला आहे. तसेच ही रक्कम दहा दिवसांच्या आत राहुल शेवाळे यांना देण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला आहे. त्याचवेळी, त्यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड ठोठावला. विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोघांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र विशेष न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा दिला आहे. त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य करण्यात आला आहे. मात्र त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.