संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार घोषित; अटक होणार की शरण येणार ?

SANTOSH DESHMUKH CASE: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार घोषित; अटक होणार की शरण येणार ?

797 0

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसांना गुंगारा देऊन चार राज्य फिरणारा आका उर्फ वाल्मीक कराड (valmik karad) हा 31 डिसेंबरला सीआयडीला शरण आला. मात्र संतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपींना अखेर फरार घोषित करण्यात आले आहेत. माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. तर आता आकापाठोपाठ संतोष देशमुख (santosh deshmukh)हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे देखील सीआयडी (CID) ला शरण येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच हे तीन आरोपी नेमके आहेत तरी कोण ? आणि या आरोपींना अटक होणार की ते स्वतःहून शरण येणार ? याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

गरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडते… काहीही म्हणजे अगदी काहीही.. याच गरिबीने सर्वसामान्य घरातील मुलं गुन्हेगारीकडे ओढली जातात. तसाच काहीसा प्रकार या आरोपींच्या बाबतीत घडला आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही सर्वसामान्य कुटुंबातील.. तिघांचही शिक्षण जेमतेमच.. ग्रामीण भागात राहत असल्यामुळे नोकरी धंद्यांचा अभाव.. आणि त्यामुळेच सळसळत रक्त असलेले तिघेही ऊसतोड मुकादमासाठी काम करू लागले. उचल घेतलेल्या कामगाराकडून वसुली करू लागले. हळूहळू वाल्मीक कराडच्या संपर्कात आले. पैसा, प्रसिद्धी आणि दहशतीमुळे का होईना पण मिळणारी इज्जत पाहून भुलले. कराडचे कार्यकर्ते झाले. आणि लहान मोठे गुन्हे करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास 302 अर्थात खुनाच्या गुन्ह्यापर्यंत येऊन पोहोचला.

आरोपींची पार्श्वभूमी

1. सुदर्शन घुले- वय 26 वर्षे – 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल
( मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खूनाचा प्रयत्न )

2. कृष्णा आंधळे- वय 27 वर्षे- 4 वर्षात 6 गुन्हे दाखल
( खुनाचा प्रयत्न, गर्दी मारहाण, आणि खंडणी )

3. सुधीर सांगळे- वय 22 वर्षे- 2 गुन्हे दाखल
( खंडणी, खुनाचा प्रयत्न)

सुदर्शन घुले टार्गेट 

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत प्रतीक घुले, महेश केदार, विष्णू चाटे, जयराम चाटे हे चार आरोपी अटकेत आहेत. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही फरार आहेत. 23 दिवसानंतरही हे तिघे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळेच हे तिघे नेमके कुठे आहेत हे शोधणं पोलिसांपुढचं आव्हान बनलंय. तर दुसरीकडे वाल्मीक कराड शरण आल्यामुळे आता सीआयडीचं पुढचं टार्गेट सुदर्शन घुले असल्याचं सांगितलं जात आहे. या आरोपींच्या मागावर 200 पेक्षा जास्त पोलीस आहेत. तर समोर आलेल्या माहितीनुसार हे तिघंही महाराष्ट्रात नाहीत. कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघं परराज्यात लपले असून मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा चक्क देश सोडून नेपाळला गेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही एका गुन्हात फरार असताना सुदर्शन घुले हा नेपाळला जाऊन लपला होता. त्यामुळे आत्ताही तो नेपाळला असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे घुले हा राज्यातच असून काही मोठ्या चेहऱ्यांनी त्याला आश्रय दिल्याचं सांगितलं जात आहे.

अटक होणार की शरण येणार ?

वाल्मीक कराड शरण आल्यामुळे आता सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही शरण येऊ शकतात अशीच चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सीआयडीने या तिघांनाही शोधण्यासाठी 150 पेक्षा अधिक कर्मचारी कामाला लावले आहेत. तसेच वाल्मीक कराड याची कसून चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात. किंवा फरार आरोपींबद्दलची माहिती देखील समोर येऊ शकते. त्यामुळे लवकरच या तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फरार असलेल्या या तिघांना अटक होणार की हे तिघे शरण येणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

WHO IS BASAVRAJ TELI: संतोष देशमुख हत्याप्रकरणात नेमलेल्या SIT चे प्रमुख बसवराज तेली आहेत कोण?
https://www.topnewsmarathi.com/crime/who-is-basavaraj-teli-the-head-of-the-sit-appointed-in-the-santosh-deshmukh-murder-case/

Share This News
error: Content is protected !!