आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

अशी आहे महाराष्ट्राची टीम छान मोदीजींच्या नेतृत्वाखाली बनेल भारताची शान; दीपक केसरकर यांच्या कवितेच्या माध्यमातून राज्य सरकारला शुभेच्छा

मुंबई: अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आता राज्यात सत्तापरिवर्तन झाले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. 

यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी कवितेच्या माध्यमातून नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. केसकर यांनी ट्विटरवरून आपली कविता शेअर केली आहे.

कर्तृत्ववान आणि धडाडीचे मुख्यमंत्री
कल्पक आणि बुद्धीवान उपमुख्यमंत्री
दिलदार आणि परखड विरोधी पक्षनेता
अशी आहे महाराष्ट्राची टीम छान
मोदीजींच्या नेतृत्वाखाली बनेल भारताची शान…

सुखी आणि समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी
टीम महाराष्ट्राला लक्ष लक्ष शुभेच्छा…!!! असं ट्विट केसकर यांनी केलं आहे.