‘हा कार्यकर्त्यांसाठी वस्तुपाठ’; राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांसाठी खास पत्र

295 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास पत्र लिहिलं आहे. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत, आपलं खरोखर अभिनंदन, अशा शब्दात राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

तुम्ही घालून दिलेला वस्तुपाठ देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखा आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी हे पत्र ट्विट केलं असून सोशल मीडियावर हे पत्र तुफान व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!