राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. नेमक्या या कोणत्या जागा आहेत पाहुयात ‘TOP NEWS मराठी’च्या ‘स्पेशल रिपोर्ट’मधून…
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी तयारी केली असून मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत विधानसभेलाही एकत्र सामोरे जाणार असल्याचं महाविकास आघाडीने सांगितलं…
कोणत्या जागा महाविकास आघाडीचे डोकेदुखी वाढवणार?
अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी दावा सांगितला आहे त्यामुळे आता ही जागा कुणाच्या वाट्याला जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..
खडकवासला विधानसभा मतदारसंघ: पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन दोडके इच्छुक आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला उपविभाग प्रमुख महेश पोकळे आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे इच्छुक आहेत त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातूनही हा विकास आघाडी तर रस्सीखेच होण्याची शक्यता आहे..
रामटेक विधानसभा मतदारसंघ: रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने दावा सांगितल्यानं रामटेक मतदार संघाच्या जागावाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्षाची शक्यता आहे
पर्वती विधानसभा मतदारसंघ: पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी नितीन कदम या इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि शहराचे माजी उपमहापौर आबा बागुल इच्छुक असल्यानं या मतदारसंघावरूनही काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे..