पुणे: देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.
अमित शहा दोन दिवस पुण्यात असूनही त्यांनी कसबा व चिंचवडच्या प्रचारात थेट सहभाग घेण्याचे टाळलं होतं याच वरून आता राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अमित शहा यांना खास पुणेरी शैलीत टोमणा मारला आहे.
“अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा!”,असा टोला रोहित पवार यांनी ट्वीट करत लगावला आहे.
अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनितिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह साहेब. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य 'निकाल' त्यांनीही हेरला असावा! pic.twitter.com/jWpP4Kmnad
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 19, 2023