Prakash Ambedkar

PRAKASH AMBEDKAR: …. तर केंद्रीय मंत्री झालो असतो प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

244 0

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच सर्व पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की बीपी सिंग यांचा राजकारण शरद जोशी दत्ता सामंत आणि प्रकाश आंबेडकर असे आम्ही तिघेजण करत होतो. 1984 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात मला मंत्रिपदाची ऑफर होती मात्र मी व्ही.पी. सिंग यांना शब्द दिला होता.

त्यामुळे मी ती ऑफर नाकारली. त्यानंतर व्ही पी सिंग हे भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातही मला मंत्रिपदाची ऑफर आली होती मात्र मी तीही ऑफर नाकारली असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!