रवी राणा बच्चू कडू यांच्यातील वाद मिटविण्याची शक्यता

265 0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता.

आणि येथूनच राणा विरुद्ध कडू हा संघर्ष सुरु झाला. दोन्ही आमदारांमधील वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून आज एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही वर्षावर बोलावलं आहे. त्यामुळे बच्चू कडू – रवी राणा यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा आणि कडू यांच्यामधील वाद हा गैरसमजुतीतून असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना योग्य ती समज देतील असं म्हटलं होतं त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवी राणा आणि बच्चू कडू यांना भेटणार असल्याने हा वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलवल्यानंतर नेत्यांनी बोलवल्यानंतर जावंच लागतं अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Share This News
error: Content is protected !!