राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कागलचे समरजीत सिंह राजे घाडगे यांनी भाजपा सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय तर राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत मात्र या नेत्यांबरोबरच आणखी कोणते नेते भाजपा सोडण्याच्या तयारीत आहेत यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट….
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक जागांवर रस्सीखेच होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपामधील अनेक नाराज नेते वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत आहेत
कोणते नेते आहेत पक्ष सोडण्याच्या तयारीत?
- समरजीतसिंह राजे घाडगे: कोल्हापूर मधील कागलचे नेते आणि पुणे महाडा चे माजी अध्यक्ष समरजीत सिंह राजे घाडगे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा नुकताच राजीनामा दिला असून तीन सप्टेंबर रोजी समरजीत घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत कागल विधानसभा मतदारसंघातून समरजीत घाडगे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार असून विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्यानं घाडगे यांनी भाजपा सोडल्याचं बोललं जात आहे.
- हर्षवर्धन पाटील: 1995 ते 2014 पर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करत निवडणूक लढवली मात्र 2019 मध्ये ही त्यांचा पराभव झाला आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा अजित पवारांच्या गटाला सोडली पाण्याची शक्यता असून विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार ची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलय.. आत्ताच कार्यकर्ता मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांनी पुढील काही दिवसात याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे..
- बापू पठारे: पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपामधील नेते बापू पठारे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या पठारे यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला मात्र पुन्हा ते घरवापसी करण्याच्या तयारीत असून त्यांना महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- रणजीतसिंह मोहिते पाटील: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ही भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलय नुकतंच लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पुन्हा एकदा घरवापसी केली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटीलही शरद पवार गटात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात नुकतंच पुण्यातील धायरीमध्ये झालेल्या शरद पवारांच्या ग्रंथ तुला कार्यक्रमाला रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते..
- प्रशांत परिचारक: महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार आणि पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मोठं असणारे प्रशांत परिचारक हे देखील भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलय…
या नेत्यांखेरीज नगरमधील विवेक कोल्हे, वाई महाबळेश्वर मतदार संघातील मदन भोसले आधी नेतेही भाजपा सोडणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून यांना थांबवण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठ काय प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..