नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात….

215 0

मुंबई: बिहार मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून नितीशकुमार यांची भाजपा सोबत फारकत घेत राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता भाजपाचे अनेक नेते नितीशकुमार यांच्यावर टीका करत आहेत. भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्यावर शरसंधान साधत उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.

चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात…. असं म्हणतात.

आता शिवसेना या ट्विटला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

Share This News
error: Content is protected !!