विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी ठरली होती; शिंदे गटातील नेत्याचं खबळबळजनक विधान

309 0

पुणे: राज्यात अभूतपूर्व सत्तांतर होऊन आता तीन महिने लोटल्यानंतर शिंदे गटातील एका नेत्याचा विधान चांगलंच चर्चेत आलं असून या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट केले होती, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाची बीज पेरलं, असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला.

नंदनवनमध्ये साडेचार तास चर्चा करताना मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. प्रेशर करा हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

सासवड येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांमध्ये बोलताना विजय शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलय

Share This News
error: Content is protected !!