Loksabha News

लोकसभा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा; ‘या’ अटीवर इंडिया आघाडीने घेतला उमेदवार न देण्याचा निर्णय

4745 0

नवी दिल्ली:  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन राजधानी नवी दिल्लीत होत असून ह्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.

लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून मोठं घामासान पाहायला मिळत असून इंडिया आघाडीकडूनही उमेदवार देण्याची चाचपणी सुरू होती.

मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार इंडिया आघाडी लोकसभा  अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार नसून उपाध्यक्ष पदावर दावा करणार असल्याचं समोर येत आहे.

https://x.com/ANI/status/1805485873271816285?s=19

लोकसभा अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून राधा मोहन सिंह ओम बिर्ला डी पुरंदरेश्वरी, भर्तूहारी महताब यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!