भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यानंतर आता काँग्रेसनेही अंतर्गत सर्वे केला असून या सर्वेनुसार महाविकास आघाडी मधील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले असून भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी त्यांच्या पक्षाचे सर्वेक्षण केल्यानंतर काँग्रेस पक्षानेही अंतर्गत सर्व्हे केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वानुसार राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं सांगण्यात आलंय. या सर्वेमध्ये काँग्रेस पक्षाला 80 ते 85 जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 50 ते 60 जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. माहितीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजपाला 60 ते 62 जागा शिंदे यांच्या शिवसेनेला 30 ते 32 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आठ ते नऊ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.