राज्यातील लाडक्या बहिणीच ठरवणार कोण होणार आमदार ?

83 0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. सगळ्याच उमेदवारांनी आपापला प्रचार देखील सुरू केला आहे. आश्वासनांच्या फैरी झाडल्या जात आहे. मात्र विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरवणार आहेत राज्यातल्या लाडक्या बहिणी.. कारण राज्यात महिला मतदारांचा आकडा मोठा असून तब्बल 38 मतदार संघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त असल्याने नेत्यांचं भवितव्य आता बहिणींच्या हातात आहे. पाहूया कोणत्या आहेत हे मतदार संघ आणि लाडकी बहीण योजनेचा सरकारला कितपत फायदा होऊ शकतो..

महिला मतदार या जितक्या सुजाण आणि जागृत असतात तितक्याच भावनिक देखील असतात. त्यामुळे त्यांच्या पसंतीस उतरण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे पावणेतीन कोटी महिलांनी या योजनेचे अर्ज भरलेत. दोन कोटी 34 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. एकूण पहायला गेल्यास एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांपैकी 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार आहेत. याचाच अर्थ जवळपास 40 ते 45 टक्के महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता याच महिला मतदारांची मतं निवडणुकीत गेम चेंजर ठरणार आहेत.

राज्यात आत्ताच्या घडीला एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार मतदार आहेत. त्यापैकी 5 कोटी 22 हजार 739 पुरूष तर 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला आणि 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार आहेत. त्यामुळे या महिला मतदारांच्या मतांवर भवितव्य भवितव्य अवलंबून असलेले 38 मतदारसंघ कोणते पाहूया…

यात पहिला आणि पुण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला मतदारसंघ म्हणजेच कसबा पेठ या मतदारसंघाचा समावेश आहे. याबरोबरच दापोली, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, राजापूर, कणकवली,नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर,भंडारा, गोंदिया,पालघर, माहिम, कर्जत, अलीबाग, श्रीवर्धन, महाड, कोल्हापूर उत्तर, कागल, चंदगड, सोलापूर शहर, अकोला पश्चिम, तिरोडा, साकोली, आमगाव, उत्तर, कुडाळ, मिरज, पलूस कडेगांव, शहादा, नंदूरबार,अर्जूनी मोरगाव, अरमोडी, डहाणू, शिरोळ आणि ब्रम्हपूरी या मतदारसंघांचा समावेश आहे.

या 38 मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. तर रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, नंदुरबार आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये महिला मतदार हे सर्वाधिक आहेत. तर असेही अनेक मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी महिला आणि पुरुष मतदारांच्या संख्येत फारसा फरक नाही. त्यामुळेच महिला मतदारांना खुश करण्यासाठी आणलेल्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना मिळणार का ? लाडक्या बहिणी सत्तेतल्या भावांची मदत करणार की विरोधातल्या भावांची साथ देणार यावर अनेक नेत्यांचं भवितव्य अवलंबून आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!