मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत ईडीनं गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.
मात्र संजय राऊत यांच्या या कारवाईमागील मूळ म्हाडाच्या एका तक्रारीत असल्याच्या ईडी’च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात
खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ‘ईडी’च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात या साऱ्या प्रकरणाचा तपशील देण्यात आला आहे. एकुण एक हजार ३९ कोटी ७९ लाख रूपयांच्या फसवणुकीचे हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. खासदार राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू कन्स्ट्रक्शन या कंपनीने गोरेगाव येथील पत्रा चाळ हा निवासी भाग विकसनासाठी घेतला.
झालेल्या करारानुसार या निवासी भागातून होणाऱ्या बांधकामांपैकी ३७२ सदनिका मूळ रहिवाशांना तर तीन हजार सदनिका ‘म्हाडा’ला द्यायच्या होत्या. मात्र, यातील कोणतेच काम पूर्ण न करता गुरू कन्स्ट्रक्शन कंपनीने या जागेवर मिळालेला ‘एफएसआय’ नऊ इतर कंपन्यांना विकला. विकलेला ‘एफएसआय’ व मूळ प्रकल्पातील एकुण व्यवसाय एकत्रित केला तर तब्बल एक हजार ३९ कोटी ७९ लाख रूपयांची ही फसवणूक आहे.
या व्यवहारात हाती काहीच न लागल्याने ‘म्हाडा’ने २०१८ साली मुंबई पोलिसांच्या अर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे गुरू कन्स्ट्रक्शनचे प्रवीण राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. पुढे हे प्रकरण राज्य सरकारकडून दाबले जात असल्याचे लक्षात येताच ‘ईडी’कडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणाच्या तपासाला सुरवात केली.