एनडीए सरकारचा आज शपथविधी; नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

1678 0

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आता एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे.

संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी समारोह संपन्न होणार असून पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या समवेत 50 ते 55 मंत्री शपथ घेणार असून 20 ते 25 कॅबिनेट मंत्री तर 25 ते 30 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे रामदास आठवले यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे

Share This News
error: Content is protected !!