Sushma Andhare

Sushma Andhare : “राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत”, सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिले ओपन चॅलेंज

440 0

मुंबई : 2022 पासून महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण नवीन नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फूट सर्वश्रूत आहे. पण, मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “आमचा पक्ष फोडला, असं सध्या बोलत आहेत. पण, मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले. तेव्हा काही वाटलं नाही का?” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. यानंतर राज ठाकरेंच्या या टीकेला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “तुमचे आमदार फोडल्यावर भाजपला जाब विचारण्यासाठी तुमच्या तोंडात दात नव्हते का?” असा तिखट सवाल त्यांनी राज ठाकरेंना विचारला आहे. “जे मिनिटा-मिनिटाला आपली भूमिका बदलत असतात. ते राज ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरेंनी आमचे नगरसेवक फोडले. तुमचे सहा नगरसेवक शिवसेनेत आल्यावर फोडल्याचं आठवत आहे. मग, राम कदम, मनोज सांगळे, प्रविण दरेकर भाजपमध्ये गेलेत ना… तेव्हा राज ठाकरेंनी आमचे आमदार का फोडले, असा प्रश्न भाजपला विचारला नाही. त्यांच्या तोंडात बोलायला दात नव्हते का? पुण्यात रूपाली ठोंबरे, वसंत मोरे यांना कुणी फोडलं? राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी घाबरत नाही,” असं म्हणत अंधारेंनी राज ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंजचं दिल आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?
“सध्या वडील चोरले या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही आणि होणार नाही. पण, आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, असं सध्या जे ओरडत आहेत. त्यांनी आपण काय उद्योग केलेत पाहा. याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवकर खोके-खोके देऊन तोडले होते. त्यावेळी काही वाटल नाही का? नगरसेवक मागितले तर दिले असते,” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरें टीका केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News
error: Content is protected !!