SUSHMA ANDHARE ON ANJALI DAMANIA: पवार,ठाकरे आडनाव समोर असलं की अंजली दामनियांना लढण्याची शिरशिरी

SUSHMA ANDHARE ON ANJALI DAMANIA: पवार,ठाकरे आडनाव समोर असलं की अंजली दामनियांना लढण्याची शिरशिरी

46 0

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीदरम्यान घडलेली घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( ANJALI DAMANIA) यांनी”जसे काका, तसेच पुतणे,अशी टीका रोहित पवार यांच्यावर केली.. तर दमानिया यांना केवळ पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असले की लढण्याची एकदम शिरशिरी येते अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (SUSHMA ANDHARE) यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीदरम्यान घडलेली एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली..या व्हिडिओमध्ये रोहित पवार एका अधिकाऱ्याला कठोर भाषेत सुनावताना दिसत आहेत.या घटनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रोहित पवार आणि त्यांचे काका अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “जसे काका, तसेच पुतणे,” असे म्हणत दमानिया यांनी थेट टीका केली.

अधिकाऱ्यांच्या कामकाजात त्रुटी असल्या तरी लोकप्रतिनिधींनी वापरलेली भाषा अयोग्य असल्याचे मतं त्यांनी x च्या माध्यमातून व्यक्त केलं. अंजली दमानियांच्या या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्यात अंजली दमानिया या व्यक्तिरेखे बद्दल मला कायमच कुतूहल वाटत राहतं. चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजीनियरिंग कंपनी याच्या संबंधाने प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली. ज्या मेघा इंजीनियरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले मात्र दमानियांनी बावन्नकुळेचा ब सुद्धा उच्चारला नाही. पण याच दमानिया काल जयंत पाटील यांच्याबद्दल वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत. मात्र आ. रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे काम झाले यावर जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या. म्हणजे भाजपचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा, भाजपच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत आणि पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असले की लढण्याची एकदम शिरशिरी येते. फारच अनाकलनीय गूढ आहे बाबा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Share This News
error: Content is protected !!