SURAJ CHAVHAN RESIGNATION : छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांची अखेर त्यांच्या पदावरून उचल बांगडी केली आहे. राज्यातील मराठा समाजामध्ये छावा संघटनेचा मोठा जनाधार आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.
केवळ छावा संघटनाच नाही तर राज्यातील इतर मराठी संघटना सुद्धा या घटनेमुळे आक्रमक झाले आहेत. सुरत चव्हाण यांनी ( SURAJ CHAVHAN RESIGNATION)तर राजीनामा दिला मात्र मुळात ज्यांच्यामुळे वाद झाला त्यांच्यावर कोणती कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे. आता या प्रकरणामध्ये नेमका घटनाक्रम काय जाणून घेऊया…
HOW TO MAINTAIN URIC ACID LEVEL: शरीरात युरिक ॲसिड पातळी वाढलीये ? कमी करण्यासाठी साधे उपाय
रविवारी 20 जुलैला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधनभावनात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल केला.एकीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत असताना कृषी मंत्री मात्र असल्याचे सांगून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले यावेळी. सुनील तटकरे यांच्याकडे पत्ते टाकत आंदोलन करण्यात आले. याच घटनेवरून काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. न मारहाणी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
TOP NEWS MARATHI : पुण्यातील गणेशोत्सवाचं कसं असणार नियोजन?
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत लातूर बंदीची हाक दिली. तसंच सुरत चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली. मारहाण प्रकरणानंतर सुरत चव्हाण यांच्यासह बारा जणांवर लातूर शहरात विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सुरज चव्हाण यांनी माफी मागितली
या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत राजीनामा मागितला. सुरज चव्हाण यांना ताबडतोब मुंबईत या असे आदेशही देण्यात आले होते. “पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही यासाठी कठोर निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं”
ज्या पद्धतीने सुरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली ती घटना अतिशय निंदनीय आहेच. आता चव्हाण यांच्यावर कारवाई झाली मात्र मुळात ज्यांच्यामुळे हवाच सुरू झाला त्या कृषीमंत्र्यांवर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.