Supriya Sule

Supriya Sule : “खासदार सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करा”, सुप्रिया सुळेंची मागणी

567 0

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे. चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली.

सुप्रिया याचिकेत काय म्हणाल्या?
पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारली आहे. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.

ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हंटले ?
खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही 4 जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

Share This News

Related Post

Raju Dongre

Nagpur Crime : भाजपा पदाधिकाऱ्याची त्याच्याच ढाब्यावर निर्घृणपणे हत्या

Posted by - November 11, 2023 0
नागपूर : नागपुरातून (Nagpur Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्रामपंचायतीत निवडूण आलेल्या एका भाजपा पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात…

VIDEO : सोनपाखरू हरवलं ! एकेकाळी बालगोपाळांसाठी आकर्षण ठरलेली दुर्मीळ कीटक प्रजाती संकटात… पाहा

Posted by - August 24, 2022 0
चंद्रपूर : साधारणत: पंधरा-वीस वर्षांपूर्वी सोनपाखरू हा बालकांचा सर्वाधिक आवडता मित्र ठरला होता मात्र बालकांसाठी विशेष आकर्षण ठरलेलं हे सोनपाखरू…
Ajit Pawar

Ajit Pawar : अनेकांना राजकारणाचे धडे देणारे अजित पवार स्वतः आहेत 10 वी पास !

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्याला जणू राजकीय भूकंपाची सवयच झाली आहे. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी…

गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपा 53 तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर

Posted by - December 8, 2022 0
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आता पुढे येण्यास सुरुवात झाली असून गुजरात मध्ये 53…

राज ठाकरेंचा पुणे दौरा; मनसेच्या गोटात तणाव; ‘त्या’ पत्रानंतर राज ठाकरे यांची कशी असणार भूमिका…

Posted by - December 27, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक सणसणीत पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. अर्थात नक्की…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *