Supriya Sule

Supriya Sule : लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंनी केले अजित पवारांचे कौतुक

364 0

पुणे : आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतुक केले आहे. सकाळी 7 वाजता अजित पवार काम करताना दिसतात आणि अजितदादा सकाळी उठून कामं करतात तेच मुख्यमंत्र्यांनी आज हेरलं, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की राज्यात क्राईम वाढतो. पुण्यात दिवस ढवळ्या खून झाला. दिवसाढवळ्या पुण्यात गाड्यांची तोडफोड होत आहे. हे गृहमंत्री आणि गृह खात्याच सपशेल अपयश आहे. जेव्हा जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त क्राईम हा नागपुरात होतो. सुनील कांबळे यांनी त्या कार्यकर्त्यांची आणि पोलीस कर्मचाऱ्याची माफी मागितली पाहिजे.. फडणवीस यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रोटेक्ट केलं नाही तर आम्ही करू. देवेंद्रजींना हात जोडून विनंती आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. त्या व्यक्तीला आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही तर मी त्यांच्या बाजूला लढणार असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

आरक्षणावर टिकणारा प्रस्ताव आणला तर पाठिंबा देऊ
सर्व समाजातील आरक्षणासाठी ट्रिपल इंजिन खोके सरकारने टिकणारा प्रस्ताव आणला तर आम्ही त्याला पूर्ण ताकदीने पाठिंबा देऊ असे सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत.

नवाब मालिकांवरून साधला निशाणा
नवाब मलिक यांच्या फोटोचा आता काय करायचं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारा. मित्र पक्षाचा मान सन्मान फडणवीस यांनी करायला हवा होता. कारण देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र ट्विट करून कुठलीच मर्यादा ठेवली नाही. नवाब मलिक यांच्या बद्दल ते दादाच्या कानात देखील बोलू शकले असते. भाजपच्या जेवढं जवळ जाईल तेवढं डेंजर त्यांनी त्यांचे सर्व मित्र पक्ष संपवले आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

छगन भुजबळ यांना लगावला टोला
छगन भुजबळ माझ्या वडिलांच्या वयाच्या आहेत… त्यांच्याबद्दल बोलणं माझ्या संस्कारात बसत नाही. लोकशाहीत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीस मिशन 45 मध्ये व्यस्त आहेत… सध्या ते टीव्हीवर कमी दिसतात मुख्यमंत्री आनी दुसरे उपमुख्यमंत्री जास्त दिसतात… फडणवीस सरकार मध्ये किती अ‍ॅक्टिव आहेत ? त्यांना किती अधिकार दिलेत ? हे कोड आहे माझ्यासाठी देवेंद्रजींवर अन्याय झालेलाच आहे रेस मध्ये पहिलेआले आणि मागे बसवले. भाजपाला शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातमीच होत नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide