Sunil Mane

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

420 0

पुणे : लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील माने (Sunil Mane) यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.

कोणत्या नेत्यांनी केला प्रवेश?
पुण्यातील मोदी बागेत मनसेचे माजी नगरसेवक राहुल तूपेरे, माजी खासदार गिरीश बापट यांचे स्विय सहाय्यक सुनील माने, माजी नगरसेवक आरिफ बागवान, हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांच्या सह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

कोण आहेत सुनील माने?
भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुनील माने यांना ओळखले जात होते. दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे निकटवर्तीय असलेल्या माने यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास माने इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. याच नाराजीतून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी काही कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी हे पक्षप्रवेश झाल्याने पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!