अखेर ठरलं! सुखविंदर सिंग सुक्खु होणार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री

192 0

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे

हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या 68 जागांपैकी काँग्रेसला 40 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय तीन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी कोणत्याही नेत्याला हिमाचलसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले नव्हते.

उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश अग्निहोत्री यांची निवड झाली असून ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी शपथविधी आज दुपारी 1:30 वाजता होणार असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!