Eknath, Ajit, Devendra

आता प्रत्येक शाळेत घुमणार गर्जा महाराष्ट्र माझाचे स्वर; राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय

609 0

School Education : शाळांमध्ये प्रार्थना , प्रतिज्ञा, राष्ट्रगीत अनिवार्य होतेच मात्र आता विद्यार्थ्यांना बालपणीच महाराष्ट्राची गौरवगाथा कळावी या करीता महाराष्ट्र राज्य सरकारकडून आणखी एका गीताचा समावेश करण्यात आला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता सगळ्या शाळांमध्ये नियमित पणे म्हटले जाणार आहे.

तीन आठवड्यांच्या आतच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश / परिपत्रक काढले असून सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दररोजचे वर्ग सुरू होताना राष्ट्रगीत/ प्रार्थनेसोबत राज्यगीत वाजवले/ गायले जावे, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यावे असे आदेश देण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!