राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यमान क्रीडामंत्री असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली असून सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे कारावास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आल्याने क्राडी मंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची न्यायालयाने सुनावली होती. नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 10 हजार दंड ठोठावला आहे.
दरम्यान न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावताच आता विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.